आबा
. . . ती तरुण मुले वेडावली होती. ती कोणत्याही सार्वजनिक नळावर पाणी पीत हुंदडत होती. मार खात होती. स्पृश्य जगाच्या कपाळावरील आठ्यांकडे उपहासाने पाहात होती. कोणत्याही देवळात शिरत होती, आणि डोक्यावर घाव घेत होती. देवाच्या मायेची पाखर घेऊन, बेडरपणे स्पृश्य जगाच्या नरड्याशी झोंबू पाहणाऱ्या रागीट नजरांशी नजर भिडवीत होती. पण अखेरीस त्या देवदर्शनाने त्यांची …